WhatsApp features: तुमच्या कॉन्टॅक्टमधील व्हॉट्सॅपवर कोण कधी ऑनलाइन होतं हे जाणून घ्या एका क्लिकवर

WhatsApp features व्हॉट्सॲप हे एक असे ॲप आहे जे जगभरात जवळ जवळ प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये असेल. सुरुवातीला मोफत मॅसेजींगसाठी वापरात येणारे व्हॉट्सॲप आता कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, मॅसेजेस, गृप्स, कम्युनिटी, पोल्स अशा एक नाही अनेक गोष्टींसाठी वापरात आणले जाते.  हि सेवा मोफत असल्याने जगभरात आपण सगळेच हे ॲप वापरतो. अगदी लहानग्यांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वांनाच या ऍपच्या उपयोगातून विविध सुविधांचा उपभोग घेण्यत मज्जा येते. या ऍपची काही वैशिष्ट्ये देखील आहेत, म्हणजे आपले स्टेटस कोणी पहावे, आपला डिपी कोणी पहावा कोणी नाही या सर्व गोष्टी आपल्या हातात असतात. या सर्व गोष्टी सेटिंगमध्ये कराव्या लागतात. अनेकांना या गोष्टी माहिती नसतात.

आता पाहता येईल कोण कोण कधी कधी ऑनलाईन होते

  बरेचदा काहींना व्हॉट्सऍपचे फिचर्स माहिती आहे ते सेटिंगमध्ये बदल करतात आणि आपण कधी ऑनलाईन आहोत ते दुसऱ्याला कळू नये याची पुर्ण सोय करतात. परंतु व्हॉट्सॅपने आता सेटिंगमध्ये असा एक बदल केला आहे ज्याच्या वापराने आपण आपल्या जवळच्या व्यक्ती कधी आणि किती वेळ ऑनलाईन होत्या हे आपल्याला कळणार आहे. WhatsApp features

व्हॉट्सॅपचं नवीन फीचर

व्हॉट्सॅपच्या या नवीन फीचरमुळे तुम्हाला तुमचा मित्र किंवा बायको तसेच बायकोला तीचा नवरा कधी ऑनलाइन आला होता याची माहिती मिळेल. लास्ट सीनची माहिती घेण्यासाठी आता यूजर्सला चॅट ओपन करण्याची गरज नाही. मेसेजिंग अ‍ॅपवरील एका क्लिकवर ही माहिती यापुढे  मिळू शकणार आहे. WhatsApp features

व्हॉट्सॅप कंपनीने  त्याच्या ग्राहकांसाठी recently online  नावाचं फीचर तयार केले आहे. तुमच्या कॉन्टॅक्ट मधील कोणतीही व्यक्ती किती काळापूर्वी ऑनलाइन होती, याची संपुर्ण माहिती या फीचरमुळे वापरकर्त्याला मिळणार आहे.

 व्हॉट्सॅप मेसेजिंग अ‍ॅप त्याच्या इंटरफेसमध्ये एक नवीन टॅब जोडणार आहे. या टॅबला recently online  असं म्हटलं जात आहे. या विभागात तुम्हाला काही वेळापुर्वी ऑनलाइन आलेल्या लोकांची नावे दिसणार आहेत. WhatsApp features

एखादा युजर जेव्हा एखाद्याला महत्त्वाचा किंवा सहज कॉल करण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा व्हॉट्सअ‍ॅप त्याला लास्ट सीनबद्दलचे डिटेल्स देईल. हे फीचर सध्या फक्त काही अँड्रॉईड बिटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. WhatsApp features

प्रोफाईल पिक्चरचा स्क्रिनशॉर्ट घेता येणार नाही

व्हॉट्सॅपवर बरेचदा आपली ओळख म्हणून आपण आपला फोटो ठेवतो. अनेकदा या फोटोज चा गैरवापर होताना दिसून येतो. म्हणूनच व्हॉट्सॅप कंपनीने प्रोफाइल फोटोशी संबंधित एक वैशिष्ट्य रोल्ड आउट केले आहे. या वैशिष्ट्यामुळे आता कोणीही तुमच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. त्यामुळे मुलींच्या फोटोचा होणारा गैरवापर टाळता येणार आहे. WhatsApp features

विशिष्ट लोकांपासून प्रोफाइल फोटो हाईड करा

काही विशिष्ट लोकांनी तुमचा प्रोफाईल फोटो पाहू नये असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही व्हॉट्सअॅपचा हा पर्याय वापरू शकता.  यासााठी आधी तुमच्या मोबाईलमधील  WhatsApp ओपन करा. त्याच्या सेटिंग्जमध्ये जा, ‘Privacy’  हा पर्याय निवडा. त्यानंतर ‘Profile photo’ पर्याय निवडा.  My Contacts यातील एक पर्याय निवडा. त्याानंतर तुम्ही तुमचा प्रोफाईल फोटो ज्यांना पाहू द्यायचा नाही त्यांना मार्क केल्यानंतर त्यांच्या नावावर टिक केली जाईल. आणि त्या लोकांना तुमचा प्रोफाईल फोटो दिसणार नाही. WhatsApp features

नंबर सेव्ह न करता करा चॅट

जर तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीसोबत चॅटींग करायची आहे ज्याचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव नाहीये. मग यापुढे तुम्ही एखाद्याचा नंबर सेव न करता देखील त्या व्यक्तीसोबत चॅटींग करू शकणार आहात. यासाठी फक्त तुम्हाला त्या नंबरसाठी व्हॉट्सअॅप लिंक तयार करावी लागणार आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीशी चॅट आपोआप उघडेल. अधिक स्पष्ट करुन सांगायचे झाले तर  तुम्हाला +915786248920 या क्रमांकावर चॅट करायचे असल्यास, तुम्हाला या URL वर जावे लागेल आणि https://wa.me/915786248920 वर जाऊन चॅट करु शकता. यामुळे तुमच्या मॅसेजची गोपनियता देखील पाळली जाणार आहे. WhatsApp features

Sharing Is Caring:

Leave a Comment